ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द खरा केला.

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द खरा केला.

शहर : मुंबई

संपूर्ण महाराष्ट्र गाढ झोपेत असताना राजकीय भूकंप घडविण्यात आला. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येणार’ हे शब्द खरे करून दाखविले. अत्यंत नाट्यमय घडामोडीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी डाव साधला की, शरद पवारांचा हा गेमप्लॅन आहे. यावर सकाळपासून चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा येथेही यशस्वी वापर केल्याचे दिसत आहे.

या संदर्भात जे घडले ते अनपेक्षित असल्याने सकाळी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे काल शुक्रवारी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे शरद पवार हे या महाविकास आघाडीचे मुख्य सुत्रधार होते. गेले काही दिवस तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या चर्चा सुरू होत्या. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रमही ठरविण्यात आल्या. दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पसंती दर्शविली. उद्धव ठाकरेही तयार झाले. तेव्हा महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सरकार येणार असेच चित्र तयार झाले होते. उद्धव ठाकरेंनी हीच ती वेळ असे म्हंटले होते. ती वेळ त्यांनी साधली, असेही वाटत होते. पण भाजपने कर्नाटक आणि गोव्यात जो फॉर्म्युला वापरला तोच महाराष्ट्रातही अंमलात आणून पुन्हा एकदा आश्चर्यचकित करणारा धक्का दिला. भाजपच्या या खेळीने राजकारणातील दिग्गज आणि मुरब्बी नेतेही अवाक झाले आहेत.

दुसरीकडे शिवसेनेचा मात्र पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. थोडक्यात शिवसेनेचा पोपट झाल्याचे म्हंटले जात आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा चंग बांधला होता. त्यासाठी त्यांनी ‘मातोश्री’ची आजवरची परंपराही बाजूला ठेवली. हिंदुत्वाचा मुद्दा असो, की अयोध्येला जाण्याचा मुद्दा असो त्यालाही त्यांनी बगल दिली. स्वत: शरद पवारांसह राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना मातोश्री सोडून अन्यत्र उद्धव ठाकरे भेटले. त्यांच्याशी चर्चा केली. इतकेच काय पण एनडीएतूनही बाहेर पडण्याचा निर्णयही त्यांनी घेतला.

कॉंग्रेस नेत्यांचा ज्या ज्या मुद्द्यावर आक्षेप होता. ते मुद्देही शिवसेनेने बाजूला ठेवले. असे सगळे बदल शिवसेनेने केल्यानंतरच आणि सत्तापदांचे वाटप निश्चित झाल्यानंतर या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी आकारास आली. आता फक्त राज्यपालांकडे महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा कोणत्याही क्षणी करील, अशी स्थिति निर्माण झाली होती. पण अचानक भूकंप व्हावा तसा राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून यांना राज्यपालांनी शपथ दिली.      

मागे

खासदार नवनीत कौर-राणा यांचं भाकीत अखेर खरं ठरलं
खासदार नवनीत कौर-राणा यांचं भाकीत अखेर खरं ठरलं

महाराष्ट्रात सत्तेचा महासंघर्ष सुरु असताना महाविकास आघाडी सरकार स्थापन क....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रात जे कांड झालं त्याबाबत बोलण्यासाठी शब्द नाहीत, भाजपला हरवणारच : काँग्रेस
महाराष्ट्रात जे कांड झालं त्याबाबत बोलण्यासाठी शब्द नाहीत, भाजपला हरवणारच : काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाक....

Read more