ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अजित पवारांवर योग्यवेळी बोलेन - देवेंद्र फडणवीस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 01:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अजित पवारांवर योग्यवेळी बोलेन - देवेंद्र फडणवीस

शहर : मुंबई

राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी ५४ आमदारांचे सही असल्याचे पत्र घेऊन भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपने त्यांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार औट घटकेचे ठरले. त्यामुळे भाजपची नाचक्की झाली आहे. सरकार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलेले नाही. अजित पवारांवर काहीही बोलले नाहीत. ज्यावेळी त्यांना अजित पवारांबाबत सांगा, तर ते त्यांचा विषय आहे. त्यांनाच विचारा असे सांगितले. त्यानंतर आज त्यांनी अजित पवारांबाबत सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय बोलणार याची उत्सुकता आहे.

भाजपने आपल्याकडे बहुमत नाही. त्यामुळे आम्ही विरोधी बाकावर बसणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, ज्यावेळी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षानी सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्यात. पंधरा दिवस झाले तरी चर्चा त्यांच्यात होत राहिली. चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना दुसऱ्या दिवशी सत्ता स्थापन करण्याचा दावा कण्याची शक्यता असताना एका रात्रीत सूत्रे सर्व हललीत आणि शनिवारी सकाळी अजित पवार यांच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे सरकार स्थापन केले. मात्र, साडेतीन दिवसानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार कोसळले. त्यानंतर फडणवीस यांनी राजीनामा दिला. मात्र, अजित पवारांनी भाजपची साथ सोडल्याने फडणवीस यांची मोठी अडचण झाली. त्यावरुन आता त्यांच्यावर टीका होत आहे. अजित पवार यांना घेवून तुम्ही चूक केली, असा प्रश्न करण्यात आला असताना मी योग्यवेळी बोलने, असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे ते आता काय बोलणार याची उत्सुकता आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत अर्धा वाटा देण्यावरुन युती तुटली. भाजप नेतृत्वाने शब्द फिरवला. मला खोटे पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मी कधीही खोटं खपवून घेणार नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत बोलणे बंद केले. त्यानंतर याचा परिणाम हा युती तुटण्यावर झाला. याचा फटका भाजपला चांगलाच बसला आहे. आपण योग्य वेळ आल्यावर अजित पवार यांच्यावर बोलेन, असे सूचक वक्तव्य  फडणवीस यांनी केले. अजित पवार यांच्याबद्दर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

 

मागे

काँग्रेससोबत आघाडीमुळे नाराज, मोदी फॉलो करत असलेल्या कट्टर शिवसैनिकाचा राजीनामा
काँग्रेससोबत आघाडीमुळे नाराज, मोदी फॉलो करत असलेल्या कट्टर शिवसैनिकाचा राजीनामा

सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी ....

अधिक वाचा

पुढे  

'हटके स्टाईल'मध्ये रोहित पवारांनी घेतली आमदारकीची शपथ
'हटके स्टाईल'मध्ये रोहित पवारांनी घेतली आमदारकीची शपथ

विधानभवनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. ज्येष्ठ, अनुभव....

Read more