By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 03:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीसांना उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची टांगती तलवार आहे. देवेंद्र फडणवीस आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा करण्याची शंका राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. देवेंद्र फडणवीस आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
अजित पवारांचा राजीनामा ?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांनी आज सकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन आपला राजीनामा सोपवल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी का....
अधिक वाचा