By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 04:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आपण राज्यपालांकडे सोपवणार असल्याचं सांगितलं आहे. सत्तास्थापन होत नव्हती, सत्तास्थापन व्हावी यासाठी सहकार्य करण्यासाठी अजित पवार आमच्याबरोबर आले होते. पण त्यांनी आम्हाला सांगितलं काही कारणांमुळे यापुढे मी तुम्हाला सोबत करू शकत नाही, मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो. यानंतर सत्ता स्थापनेसाठी जेवढे आकडे पाहिजे, बहुमतासाठी जेवढे आकडे पाहिजेत तेवढे एकटे भाजपाकडे नाहीत, म्हणून आम्ही म्हणजे मी देखील माझा राजीनामा राज्यपालांकडे सोपवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आम्ही जागृत विरोधी पक्षाचा आवाज जरूर होवू, एक जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
तसेच जनतेने हा कौल दिला आहे, तो फक्त भाजपाला दिला आहे, असं म्हणता येईल, कारण आम्ही जेवढ्या जागा लढवल्या, त्यात 67 टक्के जागांवर विजय मिळवला आणि शिवसेनेने जेवढ्या जागा लढवल्या, त्यात फक्त 44 ठिकाणी विजय मिळवला.
तसेच यापुढे जे सरकार स्थापन करणार आहेत, त्यांना शुभेच्छा. पण याठिकाणी सांगू इच्छितो हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आपल्या खालीच दबल जाईल. कारण आहे याची मतभिन्नता, ही फार काळ टिकेल असं वाटत नसल्याचंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री यापुढे म्हणाले, शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांचा एकच उद्देश होता, एकत्र येऊन भाजपाला दूर ठेवणे, जरी त्यांना जनमताचा कौल नव्हता.तसेच कशाप्रकारे का असेना आमच्यासोबत जे होते, असं सांगत शिवसेनेचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे आभार मानले.
तसेच शिवसेनेशी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची कोणतीही बोलणी झाली नव्हती. तरी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागण्याच्या मुद्यावर शिवसेना अडून बसली आणि विरोधी पक्षासोबत गेली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश....
अधिक वाचा