ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजप नेत्याचा गौप्यस्फोट,फडणवीसांकडून केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 02, 2019 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजप नेत्याचा गौप्यस्फोट,फडणवीसांकडून केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत

शहर : मुंबई

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला, असा गौप्यस्फोट भाजप नेते अनंत हेगडे यांनी केला आहे. हा निधी परत करण्यासाठीच ८० तासांचा मुख्यमंत्री व्हायचा ड्रामा करण्यात आल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला आहे.

फडणवीस १५ तास मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ४० हजार कोटी रुपये केंद्राला परत केले आणि मग राजीनामा दिला. महाराष्ट्र विकासआघाडी सत्तेत आली तर विकासासाठी असलेल्या निधीचा गैरवापर होऊ शकतो, असं फडणवीस यांना वाटलं आणि त्यांनी हे पाऊल उचललं, असं हेगडे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी हा ड्रामा कशाला केला? बहुमत नसल्याचं आम्हाला माहिती नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री कसे झाले? प्रत्येक जण असे प्रश्न विचारत आहे, असं वक्तव्य अनंत हेगडे यांनी केलं आहे.

या सगळ्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमध्ये निवडणूक असताना मतं मिळवण्यासाठी हेगडे असं वक्तव्य करत आहेत. पैसे पाठवून परत घेण्याची तरतूद कोणत्या नियमात आहे, असं मला वाटत नाही. असं झालं असेल तर नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल. भाजपवाले लबाड आहेत, मतं मिळवण्यासाठी अशाप्रकारे बोलतात, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

 

मागे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा फडणवीसांचा प्रयत्न केली 'ही' मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा फडणवीसांचा प्रयत्न केली 'ही' मागणी

विधिमंडळाच्या कामकाजात अतिशय सक्रिय आणि अभ्यासू आमदार अशी देवेंद्र फडणवी....

अधिक वाचा

पुढे  

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?
पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?

भारतीय जनता पार्टी नेत्या पंकजा मुंडे भाजपला सोड चिट्टी देऊन शिवसेनेत जाणा....

Read more