ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...तर या कार्यकर्त्याला श्रद्धांजली म्हणून धनंजय मुंडेंनी केली सभा रद्द

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 02:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...तर या कार्यकर्त्याला श्रद्धांजली म्हणून धनंजय मुंडेंनी केली सभा रद्द

शहर : बीड

लोकसभा मतदार संघात परळी शहरात गुरुवारी सायंकाळी गणेशपार या नावाजलेल्या भागात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची रात्री आठ वाजता जाहीर सभा होती. गणेशपार भागात सभा घेतली की विजय निश्चितच होतो अशी अनेक पक्षांची धारणा, त्यामुळे येथील सभा ही महत्त्वाची समजली जाते. त्यात परळी हे मुंडेंचे होमग्राउंड असल्याने ते लोकप्रियही आहेत आणि त्यांना ऐकायला मोठ्या प्रमाणावर गर्दीही जमली होती.
जवळपास दोन तास आधीच संध्याकाळी सहा वाजताच सभेला गर्दी झाली होती, मात्र साडे नऊ वाजता मुंडे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी चक्क व्यासपीठावर येऊन ही सभा रद्द केल्याचे जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला. सूत्रसंचालकाच्या हातातला माईक ताब्यात घेत मला माफ करा मी आज येथे भाषण करायला आलेलो नाही, पुन्हा कधीतरी नक्कीच येईन असे त्यांनी सांगितले. तुमच्याशी बोलण्यापेक्षा मला आज एका गोष्टीचे वाईट वाटत आहे की या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता वैजनाथ दहातोंडेचे काही तासांपूर्वीच दुःखद निधन झाले आहे, म्हणून त्यांनी ही सभा रद्द केली.

मागे

मोदींच्या सभेला काळे कपडे घालून जाण्यास मनाई
मोदींच्या सभेला काळे कपडे घालून जाण्यास मनाई

आज अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत काळ....

अधिक वाचा

पुढे  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाठोपाठ अजून एका नेत्यांच्या सभेची मागणी...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाठोपाठ अजून एका नेत्यांच्या सभेची मागणी...

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांची मागणी राज्....

Read more