ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ईडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा औरंगजेबास मुजरा - धनंजय मुंडे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 06:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ईडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा औरंगजेबास मुजरा - धनंजय मुंडे

शहर : uran

तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवाल राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला. ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी मावळमध्ये जोरदार समाचार घेतला. हाफ चड्डीची फुल पॅन्ट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही. २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या चड्डीत रहायचे. नाहीतर निवडणूकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही असा टोला धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उरण येथील कोप्रोली नाका सभेस संबोधित केले. या सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी  मुख्यमंत्र्यांवर आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. पवार कुटुंबियांनी जबाबदारी घेतली की त्या भागाचा विकास करणं हे त्यांचे ब्रीदवाक्य असते. शरद पवारांचे नातू अजित पवारांचे चिरंजीव असलेल्या पार्थमध्येसुद्धा लोकांसाठी झोकून देऊन काम करण्याची धमक आहे. त्यामुळेच उरण भागातून सर्वाधिक लीडने पार्थ पवारांना निवडून द्या असे आवाहन धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले. अधर्माच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनास साद घातली होती. मावळची लढाई जिंकण्यासाठी मोठ्या विश्वासाने पार्थ पवारांना उमेदवारी दिली आहे. पार्थच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवरील बंदरालगत असलेल्या शहरांसारखाच उरण शहराचा विकास होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलामावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपाकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार लोकसभा लढवत आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाला घेऊन पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 

मागे

प्रज्ञा सिंह “सिंगर” म्हणून जेलमध्ये गेल्या होत्या का ? राज ठाकरेंचा सवाल
प्रज्ञा सिंह “सिंगर” म्हणून जेलमध्ये गेल्या होत्या का ? राज ठाकरेंचा सवाल

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आपल्याला जेलमध्ये असताना आपल्याला तत्कालीन अ....

अधिक वाचा

पुढे  

कोर्टात हजर न राहिल्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट जारी
कोर्टात हजर न राहिल्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट जारी

लोकसभा निवडणुकांनी राज्यासह देशभरात वातावरण तापलेले आहे. त्यातच मराठा क्र....

Read more