By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 06:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बीड - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच भगवानगडावर आले. नगद नारायण गड, भगवान गड, गहिनीनाथ गड व जिल्ह्यातील इतर कोणत्याही गडावर इथून पुढे राजकारण होणार नाही, होवू दिलं जाणार नाही. असा टोला त्यांनी लगावला.
शक्ती पिठाचे दर्शन घेवून विकासाला सुरुवात करणार, मी उतणार नाही, मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो असं सांगत त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना टोला लगावला. ते म्हणाले, विकासाचा हा शब्द देत धनंजय मुंडेनी नव्या वाटचालीला सुरुवात केली.
मंत्री आणि पालकमंत्री आज पहिल्यादा बीड जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर त्यानी सर्वप्रथम नगद नारायण गडावर जावून दर्शन घेतलं. यावेळी गडाच्या वतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की जिल्ह्याच्या विकासासाठी नगद नारायणाने आशीर्वाद द्यावेत, देवस्थान च्या विकास करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांना घेवून येणार आहे. आराखड्या बाहेर जावून विकास केला जाईल.
मुंबई - आज विधानसभेत झालेली विशेष बैठक पार पडली असून या बैठकीत क....
अधिक वाचा