ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काँग्रेसच्या बड्या नेत्यानेच उडवली महाविकासआघाडीच्या फ्लोअर टेस्टची खिल्ली, म्हणाले...!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 09:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30

काँग्रेसच्या बड्या नेत्यानेच उडवली महाविकासआघाडीच्या फ्लोअर टेस्टची खिल्ली, म्हणाले...!

शहर : देश

राजकीय घडामोडींमुळे सध्या राज्यात वातावरण ढवळून निघालं आहे. अशात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र येऊन मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकीत हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन करत आहेत. तीनही पक्षांचे आमदार, समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारही यावेळी उपस्थित आहे. महाआघाडीचे 162 आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेडही होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व नेते हजर आहे.

आमदारांच्या या शक्तीप्रदर्शनाची मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांनीच खिल्ली उडवली उडवली आहे. लोकशाहीमध्ये फ्लोअर टेस्ट विधानसभेमध्ये सदनाच्या आतमध्ये होते. कोणा हॉटेलमध्ये नाही असं दिग्विजयसिंग म्हणाले आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी का दिला? असा सवाल यावेळी दिग्विजयसिंग यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ऐवढ्या कालावधीमध्ये घोडेबाजर होण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर दिग्विजयसिंग यांनी आक्षेप घेत प्रश्न उपस्थित केले आहे.

दरम्यान, बोलताना दिग्विजयसिंग यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार हे भाजपमध्ये जाण्याचं कारण आता समोर आलं. तब्बल 9 प्रकरणांची चौकशी बंद करण्यात आली आहे. आधी भाजपचे देवेंद्र फडणवीस म्हणायचे की अजित पवार तुरुंगात जातील. पण आता अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि भ्रष्ठाचाराचे सर्व आरोप मागे घेण्यात आले.

या सगळ्या राजकीय घडामोडीतही महाराष्ट्रामध्ये काँग्रेससोबतच सरकार स्थापन होईल असा दावा दिग्विजयसिंग यांनी केला. आमच्यासोबत धोका झाल्याचं शरद पवार स्वत: म्हणत आहेत. सुप्रिया सुळे चांगल्या नेत्या आहेत. भविष्य त्यांच्या हातात आहे. काँग्रेसने सरकार स्थापन करण्याचा निर्णय उशिरा घेतला. यावर दिग्विजयसिंग म्हणाले की, काँग्रेस विचार करून पाऊलं उचलते. त्यामुळे आम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेतला नसल्याचं दिग्विजयसिंग म्हणाले.

 

मागे

माझ्या निष्ठेवर प्रश्न नको, 'त्या'दिवशी मी दुपारी एकपर्यंत झोपलो होतो : धनंजय मुंडे
माझ्या निष्ठेवर प्रश्न नको, 'त्या'दिवशी मी दुपारी एकपर्यंत झोपलो होतो : धनंजय मुंडे

 राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर रोजी ब....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय

देवेंद्र फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्....

Read more