ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रवादीचे दिलीप वळसेपाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 29, 2019 04:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रवादीचे दिलीप वळसेपाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड

शहर : मुंबई

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसेपाटील यांची अखेर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याआधी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली होती. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, महाराष्ट्र विकास आघाडीने हंगामी अध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती.

हंगामी अध्यक्ष बदलण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यपालांना पत्र देखील दिलं होतं, पण भाजपकडून हंगामी अध्यक्ष बदलू नये अशी मागणी होत होती. मात्र अखेर राज्यपालांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसेपाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली आहे.यापूर्वी कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष होते. त्यांच्या हस्ते नवनियुक्त आमदारांना आमदारकीची शपथ देण्यात आली होती.सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पहिल्याच दिवशी हंगामी अध्यक्षपदावरून संघर्ष पाहायला मिळाला. येत्या काळातही हा संघर्ष दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भाजपच्या नेत्यांना विरोधी बाकावर बसण्याचा अनुभव आहे. एक मजबूत विरोधक जे मागील 5 वर्षात दिसले नाहीत, ते आता भाजपच्या रूपात दिसून येत आहेत.

 

मागे

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकुर यांची संसदेत माफी
भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकुर यांची संसदेत माफी

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकुर यांनी लोकसभेत माफी मागितली आहे. आपण केलेल....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकारांकडून 'या' अपेक्षा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकारांकडून 'या' अपेक्षा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालय आणि विधी....

Read more