By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 03:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेनेने मुंब्रा-कळवा मतदारसंघातून मराठी अभिनेत्री दीपाली सय्यदला उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्यामुळे शिवसेनेने नावे जाहीर केली आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उमेदवार आहेत.
मुंब्रा-कळव्यातून जितेंद्र आव्हाड यांनी 2009 च्या निवडणुकीतही मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडूनही उमेदवार देण्यात येणार आहे, शिवाय एमआयएमच्या उमेदवारामुळेही मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं कळवा-मुंब्रा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे. 2014 च्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांनी तब्बल 1 लाख 18 हजारांपेक्षा जास्त, तर शिवसेना उमेदवार दशरथ पाटील यांना 38 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे दीपाळी सय्यद यांना उमेदवारी....
अधिक वाचा