By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 27, 2020 04:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : hyderabad
हैदराबाद : आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने आज कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. विधान परिषद संपवण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी आज सोमवारी सकाळी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कॅबिनेटच्या या बैठकीनंतर आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनात विधान परिषद संपुष्टात आणण्यासाठी सभागृहात चर्चा रंगतांना दिसणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या आमदारांनी विधानसभा अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
जगनमोहन रेड्डी यांच्या हाती आंध्राची सत्ता असल्याने विधान परिषदेत त्यांनी तीन राजधानीचा महत्वाकांक्षी योजना आणली होती. परंतु, संख्याबळ कमी असल्याने याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे रेड्डी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना बारगळली असल्याचे समजले जात आहे. सध्या देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे.
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात झ....
अधिक वाचा