By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : varanasi
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे. सर्वच पक्षांचे राजकीय नेते एकमेकांवर मिळेल त्या शब्दात आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, जनता दल (यूनाइटेड ) पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांच्या वादग्रस्त विधानावर बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी अर्वाच्च भाषेत टीका केली आहे.
‘भाजप तसेच जनता दल नेते बाथरूममधील किडे आहे, तसेच प्रियांका गांधींनी पंतप्रधानांना दुर्योधन बोलून चूक केली आहे. त्या सर्वांना दुसरी भाषा वापरायला हवी ते तर जल्लाद आहे. अशी टीका राबडी देवी यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी, बिहारच्या जनता दल (यूनाइटेड ) पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांनी लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारतीची तुलना शूर्पणखा बरोबर केली होती. यामुळे चांगलेच वादंग निर्माण झाले असून यावर बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी संजय सिंह यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या दुर्योधनाच्या उपमेवर देखील भाष्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी विविध पक्षांकडून पोस्टर्स आणि फलक ....
अधिक वाचा