ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भीतीपोटी बॉलिवूडचे कलाकार करतात मोदींचे समर्थन - प्रिया दत्त

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 29, 2019 11:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भीतीपोटी बॉलिवूडचे कलाकार करतात मोदींचे समर्थन - प्रिया दत्त

शहर : मुंबई

2019 ची लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना सर्वच पक्षातून नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. बॉलिवूडचे कलाकार भीतीपोटी मोदींचे समर्थन करत असल्याचे माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी म्हटले आहे. प्रिया दत्त यांनी बॉलिवूड कलाकारांकडून मोदी सरकारला दिले जाणारे समर्थन या ट्रेंडविषयी चर्चा केली. सरकारला दिल्या जाणाऱ्या या समर्थनामागे भीती असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया दत्तने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉलिवूड कलाकारांकडून मिळणारे समर्थन हे भीतीपोटी दिले जात आहे. प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. या मतांचा समाजावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपले मत स्पष्टपणे मांडण्यात आले पाहिजे असे प्रिया दत्त यांनी म्हटले आहे. तुम्हाला वाटत नाही का या समर्थनामागे भीती आहे? मी असाच विचार करते. नाहीतर असा इतका मोठा बदल कसा झाला? असा सवालही प्रिया दत्त यांनी केला आहे. 

प्रिया दत्त बॉलिवूड अभिनेते सुनिल दत्त आणि नरगिस यांची मुलगी आहे. प्रिया दत्त यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.  2014 रोजी झालेल्या निवडणूकीत भाजपाच्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. त्यानंतर यंदा होणाऱ्या 2019 सालच्या लोकसभा निवडणूकीत पुन्हा एकदा पूनम महाजन आणि प्रिया दत्त आमने-सामने येणार आहेत. 

 

मागे

आज होणार पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा फैसला
आज होणार पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा फैसला

देशभरात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना पंतप्रधान नरेंद्र....

अधिक वाचा

पुढे  

विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना विरोधकांनी आखला होता डाव - पंतप्रधान
विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना विरोधकांनी आखला होता डाव - पंतप्रधान

भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या कैदेत असताना ....

Read more