ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2020 10:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे

शहर : मुंबई

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) आणि पूर्वेश सरनाईक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचं भाजपनं समर्थन केलं आहे.

सरनाईक कुटुंबियांच्या व्यवसायाशी तसेच इतर व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे ईडीकडून तपासण्यात येत आहे. त्याशिवाय गेल्या 4 वर्षात केलेले व्यवहार ईडी तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोमय्यांकडून कारवाईचं समर्थन

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा खोटी कमा केली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या, असं सोमय्या म्हणाले. मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे काही नेते मग ते मुंबईतील असो की इतर ठिकाणचे महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हप्ते घेतात, अशा लोकांवर कारवाई करायला नको का?, असा सवालही त्यांनी केला.

मुंबईतील माफिया कॉन्ट्रॅक्टरकडून या सर्वांना हप्ते जात असताततर त्याच्यावर कारवाई नको. मुंबईचे महापौर झोपडपट्टी वासियांचे कार्य ढापतात, जर उद्या न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले तर असं म्हणाल की मी शिवसेनेची आहे म्हणून कारवाई भ्रष्टाचारी हे भ्रष्टाचारी असतात. मग तो कोणीही असो, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

जो माफिया कॉन्ट्रॅक्टरचा पैसा घेत असेल, तर ती सूडबुद्धीने नाही. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी आणि त्याचं स्वागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही? सचिन सावंत

लोकशाही धोक्यात, भाजप नेत्यांना नोटिसा का नाही? हीन पातळीचं राजकारण करणारा भाजप पक्षविरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी असे घाणेरडे डाव भाजप करतंय .. लोकांना चिंतन करण्याची वेळ आहे ज्यांना निवडून दिलंय ते लोकशाहीवर घाला घालत आहेत. द्वेष बुद्धीने हे छापे समोर आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिली.

गेल्या 6 वर्षात एकाही भाजप नेत्यावर रेड का नाही? त्यांना नोटीस का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही? असा सवालही सचिन सावंत यांनी केला.

सरनाईकांवर महिला आयोगाकडून कारवाईचा बडगा

दरम्यान अभिनेत्री कंगना रनौतला धमकी दिल्याप्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर महिला आयोगाने कारवाईचा बडगा उगारला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना रनौतला धमकी दिली आहे. त्यांना तात्काळ अटक करावी. मी स्वतः या प्रकरणाची दखल घेत आहे. असं ट्वीटमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना टॅग करत केलं

प्रताप सरनाईक कोण आहेत?

प्रताप सरनाईक हे शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते आमदारकी भूषवतात. सरनाईक यांचा जन्म वर्ध्याचा. लहानपणी ते मुंबईला स्थायिक झाले.

प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीतून राजकीय कारकीर्द सुरु केली. 2008 मध्ये त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. लगेचच 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले.

विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचा परिचय

विहंग हे प्रताप सरनाईक यांचे ज्येष्ठ पुत्र, तर पूर्वेश हे सरनाईक यांचे कनिष्ठ पुत्र. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी सरनाईक भावंडांचे घनिष्ठ संबंध आहेत.

पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. युवासेनेच्या मोहिमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी असतात. पूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक 29 चे प्रतिनिधित्व करतात.

विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून ते 1989 पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सामील आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे त्यांचे रहिवासी प्रकल्प आहेत.

 

मागे

'राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज्यपालांना भेटायला का गेले हे संजय राऊतांना आता कळाले असेल'
'राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज्यपालांना भेटायला का गेले हे संजय राऊतांना आता कळाले असेल'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे काहीच निर्णय घेऊ शकत नाहीत, हे माहिती अस....

अधिक वाचा

पुढे  

'राज्यात दोन महिन्यात भाजपची सत्ता येणार', रावसाहेब दानवेंचा दावा
'राज्यात दोन महिन्यात भाजपची सत्ता येणार', रावसाहेब दानवेंचा दावा

महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची....

Read more