ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ईडीच्या अशा नोटीशीला मनसे भीक घालत नाही : संदीप देशपांडे

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 04:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ईडीच्या अशा नोटीशीला मनसे भीक घालत नाही : संदीप देशपांडे

शहर : मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसूली संचालयाकडून (ईडी) नोटिस बजावण्यात आली आहे. येत्या 22 ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र मनसे अशा नोटीशिना भीक घालत नाही, अशी पहिली प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात बोलताना देशपांडे यांनी म्हटले आहे की, ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी ईव्हीएम विरुद्ध आंदोलन सुरू केल, वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांच्या भेटी घेतल्या त्याची एक प्रकारची भीती भारतीय जनता पार्टीच्या मनात आहे. गेल्या 5-6 वर्षात मोदी सरकार सत्तेत आल्यापासुन भाजपाच्या कुठल्या नेत्याची ईडीची  किंवा सीबीयायची चौकशी झाली का? यांचे नेते तुरुंगात बसून जे पीडित आहेत त्यांच्यावर ट्रक घालतात, त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची कुठलीही चौकशी होत नाही. मुंबई बँकेचा घोटाळा. प्रकाश मेहतांचा घोटाळा या कुठल्याही प्रकरणात चौकशी झाली नाही.मुंबई बँकेचा घोटाळा, प्रकाश मेहतांचा घोटाळा या कुठल्याही प्रकरणात चौकशी झाली नाही. सरकारला फक्त राज ठाकरेंच आठवतात. कोहिनूर मिलच प्रकरण अतिशय जून आहे. इतकी वर्ष झाल्यानंतर सरकारला आताच का जाग आली ? असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान राज ठाकरेंना पाठविण्यात आलेल्या या नोटीसीवरून सरकार सूडबुद्धीचे राजकारण करीत असून हा लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रकार असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

मागे

कलम 370 : जम्मू काश्मीर मुद्द्यावरून लंडनमध्ये आंदोलन
कलम 370 : जम्मू काश्मीर मुद्द्यावरून लंडनमध्ये आंदोलन

जम्मू काश्मीर मुद्द्यावर आंतर राष्ट्रीय पातळीवरून कोणतेच सहकार्य मिळत नस....

अधिक वाचा

पुढे  

बीएसएनएलचे 2 अधिकारी निलंबित
बीएसएनएलचे 2 अधिकारी निलंबित

जम्मू-काश्मीरमध्ये 4 ऑगस्ट रोजी इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा बंद करण्यात आली ह....

Read more