By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 02:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कुलाबा येथील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने स्थापक होणार्या महाविकास आघाडीत मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता असलेल्या कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
काल ईडीने पुन्हा एकदा आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू केली. ईडीचे अधिकारी आदर्श गृहनिर्माण सोसायटीत दाखल झाले आणि त्यांनी तेथील घरांचीही मोजणी केली. मात्र याबाबत अध्याप कोणत्याही अधिकार्याने प्रतिक्रिया दिली नाही. हा आदर्श घोटाला उघडकीस आल्यानंतर अशोक चव्हाण यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
अलीकडे भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षण मंत्रालया....
अधिक वाचा