ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'मक्कल निधी मैयम'च्या सभेत अंडे-दगडांचा हल्ला; प्रत्येक धर्मात दहशतवादी, कमल हसन यांचं प्रत्यूत्तर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2019 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'मक्कल निधी मैयम'च्या सभेत अंडे-दगडांचा हल्ला; प्रत्येक धर्मात दहशतवादी, कमल हसन यांचं प्रत्यूत्तर

शहर : arakkonam

कमल हसनच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या 'मक्कल निधी मैयम'च्या एका सभेत गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न झाला. दोन अज्ञातांनी मंचावर कथित रुपात अंडे आणि दगडांचा मारा केला. त्यामुळे घटनास्थळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. अरावकुरिचीमध्ये घडलेल्या या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. कमल हसन आपलं भाषण संपवून मंचावरून खाली उतरत असतानाच स्टेजवर अंडे आणि दगड फेकण्यात आले. परंतु, पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत कमल हसन यांना सुरक्षित स्थळी हलवलं.

बुधवारी रात्रीही तिरुपरंकुंडरम विधानसभा मतदारसंघातही कमल हसन यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली होती... यावेळी ते या गाडीवर उभे राहून ते एका राजकीय सभेला संबोधित करत होते. कमल हसन यांना चप्पल लागली नाही परंतु, ही कृती करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंउल्लेखनीय म्हणजे, या घटनेनंतर कोइम्बतूर जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी सुलूर फेरनिवडणुकीत प्रचार करण्यासाठी कमल हसन यांना परवानगी नाकारली आहे.

काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी नथूराम गोडसे संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. स्टेजवर अंडे आणि दगड फेकल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं, 'मला वाटतं राजकारणाची पातळी खूपच खालावलीय. पण मला भीती वाटत नाही. प्रत्येक धर्मात दहशतवादी आहेत. याबद्दल आपण खोटे दावे करू शकत नाही. इतिहास साक्षी आहे की प्रत्येक धर्मात कट्टरतावादी आहेत'.

'मला अटकेची कोणतीही भीती नाही. त्यांना मला अटक करू द्या, त्यांनी असं केलं तर त्यांच्याच समस्या वाढतील. पण ही चेतावणी नाही तर सल्ला आहे' असंही कमल हसन यांनी म्हटलंय. 'नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी आहे' असं वक्तव्य कमल हसन यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.फिल्मी दुनियेतून राजकारण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कमल हसन यांनी आपल्या विरोधकांना आव्हान देत 'योग्य आरोप' करण्याचा सल्ला दिलाय.

 

Recommended Articles

मागे

नथुराम गोडसे हा देशभक्त होता आणि राहील; प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा बरळल्या 
नथुराम गोडसे हा देशभक्त होता आणि राहील; प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा बरळल्या 

भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकद�....

अधिक वाचा

पुढे  

अजित पवार यांचा राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारवर जोरदरा हल्लाबोल
अजित पवार यांचा राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारवर जोरदरा हल्लाबोल

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघाचा आढावा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमु�....

Read more