By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 02:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
ग्रीस - संसदेने बुधवारी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतीपदी महिलेची निवड केली आहे. ६३ वर्षीय एकातेरिनी केल्लापोउलो यांच्या बाजूने २६१ खासदारांनी मतदान करत रिपब्लिक ग्रीसचा राष्ट्रपती निवडल्याचे उद्गार संसदेचे अध्यक्ष कोस्टास सॉलस यांनी काढले आहेत.
केल्लापोएलो या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या कन्या असून त्यांनी पॅरिसच्या सोरबोन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. कौन्सिल ऑफ स्टेट ऑफ ग्रीसच्या त्या पहिल्या प्रमुख असतील. तर ग्रीसच्या राष्ट्रपतीसह त्या कमांडर इन चीफही असणार आहेत. ग्रीसमध्ये सरकार स्थापण्यासाठी तसेच कायद्यांना राष्ट्रपतींकडून मंजुरी घ्यावी लागते.
तसेच सरकारसोबत मिळून युद्धाची घोषणा करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. ६४ वर्षीय केल्लापोउलो ग्रीसच्या सर्वोच प्रशासकीय न्यायालयाच्या अध्यक्ष असणार आहेत. प्रोकापिस पावलोपोलस यांची जागा केल्लापोउलो घेणार आहेत. त्या १३ मार्च रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या निवडणुकीत विजयासह केल्लापाउलो यांनी राजकीय क्षेत्रात सद्भावाचे नवे उदाहरण सादर केले आहे. ३०० सदस्यीय संसदेत केल्लोपाउलो यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांचेही मत प्राप्त झाले आहे.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन आज पार पडत असून या....
अधिक वाचा