By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2019 03:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एकनाथ खडसे यांची पक्षनिष्ठा आज वेळोवेळी दिसून येत आहे, तेवढीच पक्षाकडून होणारी अवहेलनाही नजरेआड करता येत नाहीय. कारण भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. कोणताही गैरप्रकार होवू नये म्हणून खडसे घराबाहेर कार्यकर्त्यांच्या गराड्यात बसले आहेत. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्याला तिकिट मिळणार नसल्याचे संकेत दिले आहेत, तरी देखील शांतता आणि संयम ठेवा असा सल्ला एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.दुसरीकडे आपल्याला तिकिट न मिळाल्यास आपली कन्या रोहिणी खडसे यांना तिकिट मिळाल्यास एकनाथ खडसे ते नाकारणार नाहीत, असं देखील संकेत एकनाथ खडसे यांच्या बोलण्यात दिसून येतात.मात्र कार्यकर्ते आक्रमक होत आहेत, कारण उद्या दुपारपर्यंत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. एकनाथ खडसे यांना तिकिटासाठी एवढी प्रतिक्षा करावी लागत असेल, तर एकनाथ खडसे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी आणि विरोधकांना दाखवून द्यावं, असं आवाहन खडसेंना कार्यकर्ते करत आहेत.
दुसरीकडे शरद पवार यांनी ठाण्यात एकनाथ खडसे आपल्याशी तीन महिन्यापासून संपर्कात असल्याचं म्हटलं असलं तरी, एकनाथ खडसे यांच्या बोलण्यात ते कुणाच्याही संपर्कात किंवा पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत अजिबात नसल्याचं दिसून येत आहे.एकंदरीत अर्ज भरण्याचा शेवटचा क्षण जवळ येत असला तरी एकनाथ खडसे आपल्या पक्ष निष्ठेवर कायम आहेत.
साताऱ्यातील वाई मतदारसंघाचे शिवसेना नेते पुरूषोत्तम जाधव यांनी बंडाचा झे....
अधिक वाचा