By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 12:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होत असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत एकनाथ खडसेंबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खडसेंच्या संभाव्य पक्षांतरासाठी सेना-राष्ट्रवादीत खेचाखेच होण्याची चिन्हं आहेत.
एकनाथ खडसे राजकीय भवितव्याबाबत काय निर्णय घेणार, भाजपला सोडचिठ्ठी दिल्यास कोणत्या पक्षात प्रवेश करणार, यावर प्रश्नचिन्हं आहे. एकनाथ खडसे यांनी बीडमधील गोपीनाथ गडावरुन 12 डिसेंबरला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांची स्वतंत्र भेटही खडसेंनी घेतली होती. त्यामुळे खडसे कोणता मार्ग निवडणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
विशेष म्हणजे जळगावातील मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचं चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले फलक काढल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे खडसे भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली होती. पंकजा भाजपमध्येच राहणार, पण माझा भरोसा धरु नका, असे उघड संकेत एकनाथ खडसेंनी गोपीनाथगडावरुन दिले होते.
खडसे नेहमीच आपल्या संपर्कात असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते, तर खडसे पक्षात आल्यास स्वागतच आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले होते. खडसेंना राजकारणात टिकायचं असेल, तर सत्ताधारी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करण्याची गरज आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे खडसे या तीनपैकी कोणत्या पक्षाची निवड करणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
नवी दिल्ली- मद्रास आयआयटीच्या कॅम्पसमध्ये नागरिकत्व सुध....
अधिक वाचा