ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एकनाथ खडसे असते तर महाराष्ट्रात हे चित्र दिसलं नसतं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 05:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एकनाथ खडसे असते तर महाराष्ट्रात हे चित्र दिसलं नसतं

शहर : मुंबई

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना मंगळवारी भाजपने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घेतली. सभागृहात बहुमत सिद्ध करू शकत नाही, हे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकनाथ खडसे असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी प्रतिक्रिया आपल्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत असल्याचे नाथाभाऊंनी सांगितले. ते मंगळवारी जळगावमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी त्यांनी म्हटले की, मला आतापर्यंत हजारो लोकांचे फोन आले. तुम्ही राजकारणात असता तर युती तुटली नसती. महाराष्ट्रात हे चित्र दिसलं नसतं. सध्या जे संकट आलंय तेही आले नसतं, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

मागे

पवार कुटुंबातील त्या एका फोनमुळे अजित पवारांचे बंड मागे !
पवार कुटुंबातील त्या एका फोनमुळे अजित पवारांचे बंड मागे !

अजित पवार यांनी राजकीय करिअरमध्ये घेतल्या सर्वात धाडसी निर्णय आता मागे घेत....

अधिक वाचा

पुढे  

जाता जाता फडणवीस सिंचन घोटाळ्यावर बोलून गेले
जाता जाता फडणवीस सिंचन घोटाळ्यावर बोलून गेले

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन अवघ्या 79 तासांत राजीनामा ....

Read more