By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 12:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपच्या काही जागा घटल्या त्याला भाजपचे काही नेतेच जबाबदार आहेत. हेतूपुरस्पर मला, चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे आणि इतर काहीजणांना प्रचाराच्या दरम्यानबाहेर ठेवण्यात आले. त्याच्यामुळे निश्चितच त्याचा फटका पक्षाला बसला आहे. आम्ही जर या निवडणूक प्रचारात असतो तर २० ते २५ जागा वाढल्या असत्या असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आरोप करताना केला आहे. दरम्यान, त्यांनी राज्यात आलेल्या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकासआघाडी सरकारला शुभेच्छा दिल्या. त्यांनी स्थिर आणि चांगले सरकार द्यावे, असे सांगत शुभेच्छा दिल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यातील सत्ता स्थापन करण्याचा पेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाराष्ट्र विकासआघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड केली गेली. तसेच संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांचा शपथविधी उद्या गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे. या सर्व राजकीय घडामोडीनंतर एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
आम्हाला जाणीपूर्वक बाजूला करण्यात आले. काहीजणांना प्रचाराच्या दरम्यान बाहेर ठेवण्यात आले. त्याच्यामुळे निश्चितच त्याचा फटका पक्षाला बसला आहे.र आम्हाला सोबत घेऊन चालले असते तर वीस पंचवीस जागांचा फरक निश्चितच पडला असता. हे आम्ही वेळोवेळी पक्षाला सांगितले. याबाबत जाब आम्ही वरिष्ठांना विचारलेला आहे, असे खडसे यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांच्यावरुन खडसे यांनी भाजपला टोला लगावला आहे. पार्टी वुईथ डिफरन्स, हे पक्षाचे धोरण होते. मात्र, अजित पवारांना घेवून तडा घेतला. त्याच्याबरोबर जाणे भाजपचे चुकीचे आहे. अजित पवार यांच्या विरोधात असलेले बैलगाडीवर पुरावे आम्ही रद्दीत विकलेले आहेत, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित करत भाजपला टोकले आहे.
महाराष्ट्र में लंबे राजनीतिक गतिरोध के बाद अब तीन दलों के गठबंधन की सरकार बन....
अधिक वाचा