By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 11:02 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात झाली असून या ठिकाणी अनेक दिग्ग्जांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये माजी पंतप्रधानांसहित दोन माजी मुख्यमंत्री आहेत. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, द्रमुक नेता दयानिधी मारन, ए राजा, कनिमोई, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरंसचे फारूक अब्दुल्ला, उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर, भाजपाच्या हेमा मालिनी, बसपाचे दानिश अली यांसारखे दिग्गज रिंगणात आहेत. याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह देखील आपले नशिब आजमावत आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. छत्तीसगडच्या कांकेर मतदान केंद्र 186 मधील कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. तर पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला टांगलेला आढळून आला. या घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रजा सिंह ठाकूर यांच्या भाजप प्रवेश....
अधिक वाचा