ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आचारसंहितेमुळे खोळंबलेल्या प्राध्यापक भरतीला आता गती...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 10:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आचारसंहितेमुळे खोळंबलेल्या प्राध्यापक भरतीला आता गती...

शहर : मुंबई

आचारसंहितेमुळे खोळंबलेल्या प्राध्यापक भरतीला आता गती मिळाली आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेल्या महाविद्यालयांना प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची भरती करता येणार आहे. त्यामूळे राज्यातील महाविद्यालयांमध्ये पुरेसे प्राध्यापक नसल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या काही योजना मिळत नसल्याची तक्रार महाविद्यालये आणि प्राध्यापक संघटनांनी केली होती. तर, संघटनांकडून सातत्याने होणारी मागणी आणि आंदोलनांनंतर अखेर भरतीची प्रक्रिया शासनाने सुरू केली.

राज्यातीत दहा अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची जवळपास ९ हजार ५८० पदे रिक्त आहेत. यापैकी ३ हजार ५८० पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता दिलीय. मंजूर झालेल्या पदांच्या भरतीसाठी मान्यता घेण्याची प्रक्रिया महाविद्यालयांनी सुरू केली. मात्र, आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भरतीच्या प्रक्रियेला खीळ बसली. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील ११८ महाविद्यालयांतील ८७० पदांना मान्यता मिळाली होती. या पदांच्या भरतीसाठी जाहिरात किंवा निवडप्रक्रिया करता येणार आहे. त्यामुळे नेट-सेट पात्र उमेदवारांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र निवड यादी राज्यातील निवडणुका झाल्यानंतर म्हणजे २९ एप्रिलनंतर जाहीर करता येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकांनंतर पुढील काही महिन्यांमध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुकाही येऊ घातल्या आहेत. मान्यता मिळाल्यास ती ६ महिनेच वैध असते. त्यामुळे निवडणुकांनंतरही महाविद्यालयांना भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी लागणार आहे.

 

मागे

राहुल शेवाळेंविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार- खासदार सुप्रिया सुळे
राहुल शेवाळेंविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार- खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्....

अधिक वाचा

पुढे  

Lok Sabha election 2019 : सोलापूर आणि पंढरपूर येथे मतदान यंत्रात बिघाड
Lok Sabha election 2019 : सोलापूर आणि पंढरपूर येथे मतदान यंत्रात बिघाड

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात झाली असून या ठिका....

Read more