ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 05:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ

शहर : मुंबई

क्रिकेटचे मैदान गाजविणारा गौतम गंभीर निवडणुकीच्या मैदानावर अडचणीत सापडला आहे. भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गौतम गंभीर यांच्या विरोधात दोन वेळा मतदान यादीत नाव असल्याच्या मुद्द्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता त्यांनतर त्यांच्यावर परवानगी न घेता प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे अडचणीत वाढ झालीय. पूर्व दिल्लीमधून गौतम गंभीर याने शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता निवडणूक प्रचारसभा घेतली. या विरोधात निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षांकडून तक्रार केली होती. त्यामुळे आयोगाने याबाबत तात्काळ दखल घेत दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांना गौतम गंभीरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याआधी गौतम गंभीर यांचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याच्या आरोप करत त्यांच्याविरोधात आपने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर १ मे रोजी सुनावणी होणार आहे. आपच्या उमेदवार आतिशी यांनी गौतम गंभीर विरूध्द  तक्रार केलीय.

मागे

पैसे वाटप प्रकरणी शेकापच्या कार्यकर्त्याला अटक
पैसे वाटप प्रकरणी शेकापच्या कार्यकर्त्याला अटक

लोकसभा निवडणूकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार आचारसंहितेनुसार थांबला. राज....

अधिक वाचा

पुढे  

७९ वर्षीय शरद पवारांनी घेतल्या ७८ सभा
७९ वर्षीय शरद पवारांनी घेतल्या ७८ सभा

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील प्रचार शनिवारी संपला. चारही टप्प्यात ....

Read more