ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2019 05:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर

शहर : देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आलेत. निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या बैठकीत सहभागी होऊ नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप लवासांनी केला आहे.निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी मागणी केली आहे की, एखाद्या प्रकरणात आयोगातील तीन आयुक्तांपैकी जर एका आयुक्ताचे मत हे अन्य दोन सदस्यांपेक्षा वेगळे असेल तर आदेशामध्ये तशी नोंद झालीच पाहिजे. लवासा यांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला आहे.मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी लवासांच्या आरोपावर प्रतिक्रीया दिली आहे. निवडणूक आयोगातील तीन आयुक्तांमध्ये मतमतांतर असू शकतात असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांमधील या पत्रव्यवहारामुळे निवडणूक आयोगाच्या प्रतिमेला मात्र धक्का बसला आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

 

मागे

केंद्रात भाजपला २९० तर राज्यात युतीच्या सर्वच जागा येतील - चंद्रकांत पाटील
केंद्रात भाजपला २९० तर राज्यात युतीच्या सर्वच जागा येतील - चंद्रकांत पाटील

केंद्रात भाजपला २९० तर राज्यात युतीच्या ४४ जागा येतील असा विश्वास महसूलमंत....

अधिक वाचा

पुढे  

एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स ८८८ अंकांनी वधारला
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स ८८८ अंकांनी वधारला

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांच....

Read more