ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Election results 2019 : नरेंद्र मोदी या दिवशी शपथ घेणार?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 04:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Election results 2019 : नरेंद्र मोदी या दिवशी शपथ घेणार?

शहर : देश

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. लागोपाठ दुसऱ्यांदा भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. भाजपने अशी दमदार कामगिरी केल्यानंतर दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे.

२६ मेरोजी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. २६ मेरोजीच भाजपने संसदीय दलाची बैठक बोलावली आहे. याच दिवशी भाजप त्यांचा संसदीय दलाचा नेता निवडला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

२०१४ सालीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ मेरोजीच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. २०१४ सालच्या मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला सार्क देशांचे प्रमुख उपस्थित राहिले होते. यामध्ये पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही समावेश होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला कोणाला बोलावतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

 

मागे

Election Result 2019: मतमोजणी दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा मृत्यू
Election Result 2019: मतमोजणी दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज  ( २३ मे )  सकाळपासून सुरुवात झाली. मतमोज....

अधिक वाचा

पुढे  

Election results 2019 : रडीचा डाव खेळण्यात मला रस नाही- उर्मिला मातोंडकर
Election results 2019 : रडीचा डाव खेळण्यात मला रस नाही- उर्मिला मातोंडकर

अभिनयाकडून राजकारणाच्या वर्तुळाकडे वळलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ....

Read more