By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 04:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भाजपचे वाराणसी मतदार संघातील उमेदवारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाची धुरा आपल्या हाती घेणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. देशातील सर्वात चर्चित मतदार संघांपैंकी एक ठरलेल्या वाराणसी मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा विजय नोंदवलाय. लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालात पंतप्रधान मोदींना तब्बल ३ लाख ८५ हजार मतांनी विजय मिळवलाय. वाराणसी मतदारसंघात काँग्रेसकडून अजय राय तर समाजवादी पक्षाकडून शालिनी यादव यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय.वाराणसीमध्ये यंदा ५६.९७ टक्के मतदारांनी आपली मतं नोंदवली होती. जवळपास १८ लाख मतदार आणि ३४ लाख लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात सध्या नरेंद्र मोदी खासदार आहेत.
२०१४ मध्ये याच मतदारसंघात ५८.३५ टक्के मतदान नोंदवण्यात आलं होतं. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी या मतदार संघात ५ लाख ८१ हजार मतं मिळाली होती. राजकीय विरोधक आणि प्रतिस्पर्धी अरविंद केजरीवाल यांना त्यांनी जवळपास पावणे चार लाख मतांच्या फरकानं पछाडलं होतं. तर अजय राय तिसऱ्या स्थानावर होते.
वाराणसी मतदार संघाबद्दल बोलायचं झालं तर हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ बनलाय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको. १९९१ नंतर झालेल्या सात निवडणुकींपैंकी सहा निवडणूक भाजपच्या पथ्यावर पडलीय. २००४ मध्ये केवळ काँग्रेसच्या राजेश मिश्रा यांना इथं विजयाची संधी मिळाली होती. परंतु, पुन्हा २००९ साली भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी काँग्रेसकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सध्याच्या घडीला ....
अधिक वाचा