By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 03:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग पुढच्या महिन्यात घोषित करण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणूक आयोगही त्यादृष्टीने तयारी करीत आहे. या तयारीचा एक भाग म्हणजे राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप करण्यात येत आहे. त्यात वंचित बहजन आघाडीला गॅस सिलिंडर , संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन, महाराष्ट्र क्रांती सेनेला हिरा, हम भारतीय पार्टीला ऊस घेतलेला शेतकरी, टिपू सुलतान पार्टीला किटली, भारतीय जनसम्राट पार्टीला, टेलिफोन अशी चिन्हे निवडणूक आयोगाने दिली आहेत.
जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलाम रद्द केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे.....
अधिक वाचा