By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 08:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जळगाव
अमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात जोरदार राडा झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि समर्थकांनी पक्षाचे माजी आमदार बी एस पाटील यांना जबर मारहाण केली. अमळनेरमध्ये आज संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरुवातीला उदय वाघ आणि बी एस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. मंचावरच दोन्ही नेते भिडले. चपला बुटांनी एकमेकांना मारलं. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकार्यांनी बी एस पाटील यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. उदय वाघ यांच्या समर्थकांनी यावेळी स्मिता वाघ आगे बढो, अशी घोषणाबाजीही केली.
उदय वाघ हे स्मिता पाटील यांचे पती आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघात स्मिता पाटील यांची उमेदवारी रद्द करुन उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होण्यामागे बी एस पाटील यांचा हात असल्याचा संशय उदय वाघ यांच्या मनात होता. त्याच रागातून ही हाणामारी झाल्याची चर्चा आहे. आज स्मिता वाघ आणि उदय वाघ यांच्या गावात भाजपचा मेळावा आयोजित केला होता. त्याचीच संधी साधून उदय वाघ आणि समर्थकांनी बी एस पाटील यांना मारहाण केली. यावेळी स्वत: गिरीश महाजन यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
निवडणुकीच्या मतदानाआधीच भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जोरदार धक्के बसत ....
अधिक वाचा