By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 04:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघात एका मतदान केंद्रात EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याची तक्रार आली. बराच वेळ मतदान केंद्रावर रांग लागलेली बघायला मिळाली. वरळीत मतदान बूथ क्रमांक 62 मध्ये मतदान यंत्र बिघडल्याने काही काळ मतदान थांबवावं लागलं. तिथल्या बूथ ऑफिसरने नवीन यंत्राची मागणी केली. त्यानंतर नवीन यंत्र आणून पुन्हा मतदान सुरू करण्यात आलं. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 62 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 5 वेळा ईव्हीएम मशीन बदलण्यात आली. 2 तासांहून अधिक काळ मतदार रांगेत वाट पाहात होते. अनेक जण कंटाळून घरी गेले. अखेर EVM मशीन सुरू झालं आणि मतदान प्रक्रिया सुरू झाली.
Sushma Satpute, Election Commission officer at Worli: There was some issue in an electronic voting machine (EVM) at polling booth number 62 of Worli Assembly constituency but the machine has been replaced and voting is going on. pic.twitter.com/V22ryylH7A
— ANI (@ANI) October 21, 2019
वरळीच्या निवडणूक अधिकारी सुषमा सातपुते यांनी मतदान बूथ क्रमांक 62 मध्ये मशीन खराब झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला. इथे EVM मशीन बदलल्यानंतर मतदान सुरळीत झाल्याची माहिती त्यांनी दिली. वरळी मतदारसंघाच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. ठाकरे घराण्यातली पहिली व्यक्ती इथून निवडणूक लढवत आहे. शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही मोठी निवडणूक ठरणार आहे.
गेली काही वर्षे शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडणार्या खासदार संजय राऊत....
अधिक वाचा