By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 05:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीशांविरुद्ध महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'छोडो भारत' देशभर आंदोलन करण्यात आले. तशाच प्रकारचे 'इव्हिएम भारत छोडो' आंदोलन येत्या 9 ऑगस्टला देशभर करण्यात येणार आहे, अशी घोषणा इव्हिएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलन च्या निमंत्रकांनी पत्रकार परिषदेत केली.
या संदर्भात अधिक माहिती देताना धनंजय शिंदे आणि ज्योती बडेकर यांनी संगितले की, 9 ऑगस्टला संपूर्ण देशात एकाच वेळी इव्हिएम विरोधी आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत दादर येथील चैत्यभूमी ते ऑगस्ट क्रांति मैदानापर्यंत लाँग मार्च काढण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी कायम राह....
अधिक वाचा