ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

"आत्तापासून मी भाजप-आरएसएससोबत", राज्यपालांच्या भेटीनंतर माजी नौदल अधिकाऱ्याची घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 15, 2020 07:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी आज (15 सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपण आत्तापासून भाजप-आरएसएससोबत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा जोरदार प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा म्हणाले, “आत्तापासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे. जेव्हा मला मारहाण झाली तेव्हा त्यांनी माझ्यावर मी भाजप-आरएसएससोबत असल्याचा आरोप केला. त्यामुळे आता मी घोषणा करतो की आजपासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे.”

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी रात्री दोन वाजता शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अटक केली आहे. या सर्वांना बोरिवली कोर्टात हजर करण्यात आलं. याआधीही या सर्वांना अटक करण्यात आली होती. मात्र, तेव्हा त्यांना जामीन मंजूर झाला होता. आता समता नगर पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता कलम 452 अंतर्गत देखील गुन्हा नोंद केला आहे.

संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आरोपींकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यांना पोलीस तपासासाठी बोलावतील तेव्हा हजर राहण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला.

मागे

... म्हणून मी मराठा आरक्षण खटल्यात युक्तिवाद केला नाही; महाधिवक्ता कुंभकोणींचा गौप्यस्फोट
... म्हणून मी मराठा आरक्षण खटल्यात युक्तिवाद केला नाही; महाधिवक्ता कुंभकोणींचा गौप्यस्फोट

भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाकडून करण्यात आलेल्या आग्रही मागणीमुळेच म....

अधिक वाचा

पुढे  

मराठा आरक्षणाबाबत लवकर कायदेशीर बाबी तपासून घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीत निर्णय
मराठा आरक्षणाबाबत लवकर कायदेशीर बाबी तपासून घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीत निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर नु....

Read more