By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 04:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा निवडणूकीसाठी मुंबई शहर जिल्हा सज्ज झाला असून येत्या 21 ऑक्टोंबर रोजी मतदानाच्या दिवशी 10 विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजात महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याच बरोबर प्रत्येक मतदारसंघात एक ‘ सखी मतदान केंद्र’ अशी दहा सखी मतदान केंद्र महिलांच्या हाती सोपविण्यात येणार आहेत. यामुळे या मतदान केंद्रात सखींकडून 100 टक्के मतदानाची अपेक्षा आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.
मुंबई शहर जिल्हयातील सखी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी, फुलांचे तोरण लावून, इतर मतदान केंद्रापेक्षा आकर्षक मतदान केंद्र असणार आहेत. या मतदान केंद्राचा संपूर्ण कार्यभार हा सर्व महिला अधिकारी, कर्मचारी पाहणार आहेत.
मुंबई शहरातील विधानसभा मतदारसंघ निहाय सखी मतदान केंद्र धारावी – सखी मतदान केंद्र क्र.111, सायन कोळीवाडा – केंद्र क्र.61, वडाळा– केंद्र क्र. 51, माहिम – केंद्र क्र. 155, वरळी –केंद्र क्र.47, शिवडी – केंद्र क्र. 186, भायखळा– केंद्र क्र.238, मलबार हिल – केंद्र क्र. 133, मुंबादेवी – केंद्र क्र. 2, कुलाबा – केंद्र क्र. 138 या प्रमाणे महिला अधिकारी व कर्मचारी यांचे व्यवस्थापन व नियोजन असलेले प्रत्येक मतदारसंघात एक ‘सखी मतदान केंद्र’ असणार आहे. या सखी मतदान केंद्रावर 1- केंद्रप्रमुख, 3 किंवा 4 निवडणूक कर्मचारी, 1-पोलिस शिपाई अशा पाच ते सहा महिलांचा समावेश असणार आहे. याबरोबरच मुंबई शहर जिल्हा 10 मतदारसंघात एकुण 178 मतदान केंद्रावर वेब कास्टींग सुविधा तर 91 मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जरवर) असणार असल्याचेही सांगितले.
सखी मतदान केंद्र स्थापन केल्यामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी मदत होईल. सखी मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी महिला असतील सखी मतदान केंद्र निवडताना केंद्रांची सुरक्षितात लक्षात घेवून संवेदनशील केंद्र टाळून पोलीस ठाण्यानजीकच्या केंद्राची तसेच ज्या मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची निवड करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत नियुक्त केलेल्या 11473 अधिकारी/कर्मचाऱ्यांपैकी 4578 महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पाळणाघर व दिव्यांगांसाठी सुविधा
विधानसभेच्या सर्व मतदार संघात महिला मतदारांच्या बाळासाठी पाळणारघराची सुविधा ठेवण्यात आली असून दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर, शिडी व्हेईकल आदी सुविधा मतदान केंद्रामध्ये असणार आहेत. 1065 दिव्यांग मतदारांनी या सुविधेसाठी आपली नाव नोंदणी केली आहे. असेही श्रीमती मुकादम यांनी सांगितले
विधानसभा निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेले राष्ट्रवादी....
अधिक वाचा