ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एफएटीएफने पाकला टाकले काळ्या यादीत

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2019 03:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एफएटीएफने पाकला टाकले काळ्या यादीत

शहर : विदेश

आर्थिक संकटात सापडलेल्या आणि दहशतवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने काळ्या यादीत टाकले आहे. साहजिकच अत्यंत नाजुक स्थितीत असलेल्या पाकला हा आणखी एक दणका मिळाला आहे.

एफएटीएफ ही दहशतवादाला आर्थिक बळ देणार्‍या देशांवर निगराणी ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. मनिलॉन्ड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देण्याशी संबंधित 40 मानदंडापैकी पाकिस्तान 32 मानदंड पूर्ण करू शकलेला नाही. त्यामुळे पाकिस्तान विरोधात एफएटीएफने कठोर पावलं उचलली आहेत. काळ्या यादीत टाकल्यामुळे पाकला कर्ज घेणे आणखी कठीण होणार आहे.

मनिलॉन्ड्रिंगचा सामना करण्यासाठी जी-7 देशांनी 1989 मध्ये एफएटीएफ या आंतरशासकीय संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचे कार्यालय फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये आहे. 2001 मध्ये या संस्थेच कार्यक्षेत्र दहशतवादाला आर्थिक पुरवठा करणार्‍या देशांवर नजर ठेवण्यासाठी वाढविण्यास आले. संस्थेची स्थापना करताना 16 सदस्य देश होते. आता ही संख्या 37 झाली आहे.

मागे

राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांसह 50 जणासह गुन्हा दाखल करण्याचे आदेश
राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांसह 50 जणासह गुन्हा दाखल करण्याचे आदेश

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 50....

अधिक वाचा

पुढे  

आता मनसेची ईडीला नोटिस, फलक मराठीत लावा
आता मनसेची ईडीला नोटिस, फलक मराठीत लावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अमलबजावणी संचालयाने नोटिस बजावून त्यांची काळ ....

Read more