ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतीय ऊर्जा क्षेत्र परदेशी गुंतवणुकदारासाठी आकर्षक ठरत आहे

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 04:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतीय ऊर्जा क्षेत्र परदेशी गुंतवणुकदारासाठी आकर्षक ठरत आहे

शहर : delhi

भारतीय ऊर्जा क्षेत्र परदेशी गुंतवणुकदारासाठी आकर्षक ठरत आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्लीत एका परिषदेत बोलत होते. भारताची अर्थव्यवस्था 7 टक्क्यांपेक्षा जास्त दराने विकास पावेल या अंदाजामुळे अधिक गुंतवणुकदार येतील असे ते म्हणाले. 

व्यवसायाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी परिवर्तनात्मक सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत. तेल आणि नैसर्गिक वायु उत्पादन क्षेत्राला अधिक गुंतवणूकीसाठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातल्या तेल आणि नैसर्गिक वायु उत्पादन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी सुरू असलेल्या धोरणात्मक सुधारणांमध्ये एकसमान परवाना धोरण, विपणनाबाबत ऑपरेटर्सना स्वातंत्र्य, गुंतवणुकदारांसाठी सर्वकष माहिती आणि आकडेवारीची उपलब्धता यांचा समावेश आहे.


लवकरच आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उदिृष्ट साध्य करण्यासाठी भारताला सुरक्षित, माफक दरातल्या आणि शाश्वत उर्जेची गरज असून उच्च विकास दर आणि 1.3 अब्ज जनतेच्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी गुंतवणूक आवश्यक आहे. त्यासाठी ऊर्जेच्या प्रत्येक स्रोताचा उपयोग करणे गरजेचे आहे असे मंत्र्यांनी सांगितले.
 

मागे

 काश्मीर प्रश्नावर केवळ द्विपक्षीय चर्चा शक्य परराष्ट्रमंत्र्यांचे अमेरिकेला प्रत्युत्तर 
काश्मीर प्रश्नावर केवळ द्विपक्षीय चर्चा शक्य परराष्ट्रमंत्र्यांचे अमेरिकेला प्रत्युत्तर 

काश्मीर प्रश्नी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हस्तक्षेप करण्य....

अधिक वाचा

पुढे  

जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा
जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा

नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू काश्मीरच्या दौर्य....

Read more