ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निवडणूक कामातील हलगर्जीपणा : वरिष्ठ सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 22, 2019 02:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निवडणूक कामातील हलगर्जीपणा : वरिष्ठ सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल

शहर : malkapur

पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक सचिन निळे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि दारू प्यायल्यानंतर शिवीगाळ केली होती. याप्रकरणी सोमवारी (२२ एप्रिल) मलकापूर शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर पंचायत समितीमध्ये वरीष्ठ सहायक पदावर कार्यरत सचिन गुलाब निळे (वय ३९) यांनी तहसील कार्यालय येथे येवून तहसील कार्यालयातील आचारसंहिता सेल अव्वल कारकून मनोज सातव यांच्याशी दारू प्यायल्यानंतर अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. तसेच निवडणूक आयोगास सुद्धा शिवीगाळ करुन माझे एका शो कास नोटीसने काय होणार? माझे कोणीही काय वाकडे करू शकत नाही, अशा शब्दात शिवीगाळ केली.

सचिन निळे यांची लोकसभा निवडणुक २०१९ करीता स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये सहायक म्हणून आचारसंहिता सेल मधून निवडणूकीचे अत्यंत महत्त्वाचे कामात १४ मार्च २०१९ पासबन नियुक्ती करण्यात आली होती. याबाबत आचारसंहिता अधिकारी यांनी आरोपी कर्मचारी यांना आधी सुद्धा कर्तव्यावर हजर नसल्याबाबत त्यांचे कार्यालय पंचायत समिती मलकापूर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असतानाही आरोपी कर्मचारी याने अत्यंत महत्त्वाचे निवडणूक ड्युटीवर हलगर्जीपणा करीत दारू प्यायल्यानंतर शिवीगाळ केली.  या प्रकरणी नायब तहसीलदार गजानन राजगडे यांनी शहर पो. स्टे.ला दिलेल्या तक्रारीवरून  आरोपी विरुद्ध भादंवि १७८/२०१९ कलम १३४ व लोक प्रतिनिधित्व कायदा 1953 सह कलम ५०४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि शैलेश पवार करीत आहे.

मागे

विश्वासघातकी पवारांच्या किती पालख्या उचलायच्या ते तुम्ही ठरवा: मुख्यमंत्री
विश्वासघातकी पवारांच्या किती पालख्या उचलायच्या ते तुम्ही ठरवा: मुख्यमंत्री

शरद पवार यांनी १९९१ पासून विश्वासघाताचे राजकारण केले. स्व: शंकरराव पाटील या....

अधिक वाचा

पुढे  

“लाचार”शिवसेना आणि “बसवलेले”फडणवीस कधी एकदा एकमेकांचा गळा घोटतील, अशी परिस्थिती आहे -: राज ठाकरे
“लाचार”शिवसेना आणि “बसवलेले”फडणवीस कधी एकदा एकमेकांचा गळा घोटतील, अशी परिस्थिती आहे -: राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बीबीसी ....

Read more