By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 30, 2019 12:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देशातल्या 100 हून अधिक फिल्ममेकर्सनी भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलंय. या संदर्भात त्यांनी एक निवेदनदेखील जारी केलंय. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्ममेकर्स एकत्र आलेत. प्रसिद्ध डॉक्युमेन्ट्री मेकर्स आनंद पटवर्धन यांच्यापासून जुजे फिल्मचा दिग्दर्शक मिरांशा नाईकपर्यंत जवळपास 111 लोकांनी भाजपा विरोधात मतदान करण्याच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
भाजपा सरकार आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली असा आरोप या सर्वांनी केलाय. शिवाय समाजात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ वाढवणे, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशीपच्या नावाखाली उगाच होणारी गळचेपी ही या विरोधाची मुख्य कारणं आहेत. सरकारच्या अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. असा आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय असं या कलाकारांचं म्हणणं आहे. भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे या पत्रकात भाजपा सरकारकडून सैन्यदलाच्या शौर्याचा केला जात असलेला गैरवापर यावर चिंता व्यक्त करण्यात आलीय. देशात उगाच युद्धाचं वातावरण तयार करणं, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक संस्था नेस्तनाबूत करणे, देशात विज्ञानविरोधी वातावरण तयार करणे, ज्या व्यक्तींचा कला, संस्कृती आणि विज्ञानाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना महत्त्वाच्या पदावर बसवणे आणि देशाचं हसू करुन घेणं.
कलात्मकतेवर खासकरुन सिनेमा आणि पुस्तकांवर बंदी किंवा सेन्सॉरशीप आणणं, जेणेकरुन लोकांना चांगल्या विचारांपासून परावृत्त करणे हे सर्व भाजपाचं सरकार आल्यापासून जाणीवपूर्वक होतंय असं या पत्रकात म्हटलं आहे. भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे, असं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. याविरोधात आता आवाज उठवला नाही तर देश असंभवाच्या गर्तेत लोटला जाईल आणि होणारं नुकसान पिढ्यानपिढ्या भरु शकणार नाही असं आर्टिस्ट युनाएटेड इंडियाचं म्हणणं आहे. या 111 लोकांच्या यादीवर नीट नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की हे सर्व फिल्म मेकर्स कधी ना कधी सेन्सॉरच्या कचाट्यात सापडलेत. गेली पाच वर्षे अभिव्यक्तीच्या दृष्टीनं अत्यंत वाईट गेली. आता तरी अच्छे दिन यावेत यासाठी भाजपाला नकार द्या असं या कलाकारांना वाटतंय.
आम्ही सत्तेत आलो तर नीती आयोगच बरखास्त करणार, अशी मोठी घोषणा काँग्रेस अध्यक....
अधिक वाचा