By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 28, 2019 09:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जो माणूस १२ वी पास नाही... ज्या व्यक्तीला कागद वाचता येत नाही त्याला राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यावर बोलण्याचा अधिकार नाही अशा शब्दात नवाब मलिक यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या टिकेला उत्तर दिले आहे.शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टिका केली होती. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचा अर्थ सांगा आणि खासदार व्हा अशी टीका विनोद तावडे यांनी केली होती त्यावर नवाब मलिक यांनी तावडेंचा चांगलाच समाचार घेतला.विनोद तावडे हे १२वी फेल आहेत. त्यांची डिग्रीसुध्दा फेल आहे. त्यामुळे त्यांना कागद वाचता येत नाही हे सिध्द केले म्हणूननच जाहिरनाम्यावर टिप्पणी करत आहे. विनोद तावडे यांनी १२ उत्तीर्ण दाखला दाखवावा व नंतर जाहीरनाम्यावर टिका करावी असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.
रायबरेली आणि अमेठी मध्ये कॉग्रेसचा निवडणूक प्रचार सांभाळणार असून बेगु....
अधिक वाचा