ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुणेकरांच्या वामकुशीमुळे 'दुपारी १ ते ४ प्रचार सभा रद्द

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 05:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुणेकरांच्या वामकुशीमुळे 'दुपारी १ ते ४ प्रचार सभा रद्द

शहर : पुणे

'ऐकतील ते पुणेकर कसले... जगात काहीही होवो...पुणेकर त्यांच्या सवयी सोडणार नाहीत...' असे पुणेकरांबद्दल म्हटले जाते. मग अगदी निवडणूकही त्याला अपवाद नाही. देशभरात हेल्मेट सक्ती असली तरी पुण्यात ती लागू होण्यासाठी सरकारला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागते.याच वामकुशीमुळे मेट्रोचं सर्वेक्षणही रखडलं होतं. तर चितळेंनी दुपारी दुकान उघडं ठेवायचं म्हटल्यावर त्याची मोठ्ठी बातमी झाली होती..असो.. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनाही पुणेकरांच्या सवयीप्रमाणे आपल्या प्रचार फेऱ्या बदलाव्या लागत आहेत. 

'दुपारी १ ते ४ प्रचार बंद आहे' असे लिहीलेली पाटी फक्त पुण्यातच पाहायला मिळू शकते. सध्या राजकीय प्रचार जोरदार सुरू आहेत. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहेत. जोरदार भाषणं करत आहेत. पण दुपारी वामकुक्षीची वेळ सोडून पाहीजे तितका प्रचार करा असा अलिखित नियम पुण्यात रूजू झाला आहे.

भाजपा उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी वापरली जाणारी जीप देखील दुपारची वामकुक्षी घेताना दिसत आहे. सकाळचा हार, तुरे, पुष्पगुच्छाचा ढीगही तसाच पडून आहे. समोरच असलेल्या भाजपाच्या शहर कार्यालयातही दोन चार कामगार सोडले तर, दुपारी कार्यकर्ता औषधालाही सापडत नाही. पुण्यात उमेदवाराचा प्रचारदौराही सकाळी ९ ते १ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत असतो. १ ते ४ वामकुक्षी म्हणजे वामकुक्षीच..याला पर्याय नाही. 

मागे

भाजपच्या विजयासाठी महादेव जानकर लागले कामाला; बारामती, सांगली, माढात करणार प्रचारला सुरुवात
भाजपच्या विजयासाठी महादेव जानकर लागले कामाला; बारामती, सांगली, माढात करणार प्रचारला सुरुवात

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने एकही जागा न दिल्यामुळे नाराज असलेल्या महाद....

अधिक वाचा

पुढे  

मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे - उर्मिला मातोंडकर
मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे - उर्मिला मातोंडकर

काँग्रेसची ईशान्य मुंबईची उमेदवार उर्मिला मातोंडकर हिच्या धर्मावरून सध्य....

Read more