ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पीएम केअर फंडशी निगडीत माहिती सार्वजनिक करा, 100 माजी नोकरशहांचं पंतप्रधानांना पत्र

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 17, 2021 01:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पीएम केअर फंडशी निगडीत माहिती सार्वजनिक करा, 100 माजी नोकरशहांचं पंतप्रधानांना पत्र

शहर : देश

पीएम केअर पंडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 100 माजी नोकरशहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर पश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोकरशहांनी शनिवारी पंतप्रधानांना एक पत्रही लिहिलं आहे. कोणत्याही शंकांचं निरसन करण्यासाठी आणि जनतेला उत्तर देण्यासाठी पीएम केअर फंडात पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिण्याचं कारण म्हणजे माहितीच्या अधिकारात पीएम केअर फंडाबाबत माहिती देण्यास नकार देण्यात आला होता आणि हे सार्वजनिक प्रकरण नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिल्याचं या नोकरशहांनी सांगितलं आहे. जर पीएम केअर फंड सार्वजनिक नाही तर मग पंतप्रधान, अर्थमंत्री, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री जे सरकारचे सदस्य आहेत ते आपलं पद, नाव आणि अधिकारांच्या मदतीनंच या फंडमध्ये ट्रस्टी आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

पत्र लिहिणाऱ्यांमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांची नावं

पीएम केअर फंडात पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी 100 माजी नोकरशहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. यात अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. माजी आयएएस अनिता अग्निहोत्री, एसपी एम्ब्रोस, सज्जाद हसन, हर्ष मंडेर, अरुणा राय, देव मुखर्जी, सुजाता सिंह, एससी बहर, के सुजाता राव, एएस दुलत यांसारख्या 100 अधिकाऱ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

आज अनेक राज्य कोरोनासारख्या महामारीनं ग्रस्त आहेत. हे राज्य या महामारीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. पीएम केअर फंडातून अशा राज्यांना मदत मिळावी असं आमचं मत असल्याचं माजी नोकरशाहांनी व्यक्त केलं आहे.

मागे

ग्रामपंचायतीसाठी सरासरी 79 टक्के मतदान, निकालाआधीच 26 हजार उमेदवारांवर विजयाचा गुलाल
ग्रामपंचायतीसाठी सरासरी 79 टक्के मतदान, निकालाआधीच 26 हजार उमेदवारांवर विजयाचा गुलाल

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक....

अधिक वाचा

पुढे  

चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या
चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे अत्यंत धक्कादायक निकाल हाती येत आहेत. या ....

Read more