ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अमरावतीत फसवणुकीची तक्रार दाखल

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 08:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अमरावतीत फसवणुकीची तक्रार दाखल

शहर : अमरावती

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात चांदूर रेल्वेत फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने ही तक्रार दाखल केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपला वचननामा जाहीर केला होता. या वचननाम्यात आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. तसेच एकही वचन खोटं ठरणार नाही, असं जाहीरनामा प्रसिद्धीदरम्यान सांगितलं होतं.तसेच राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच वचननामा तयार केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेव्हा स्पष्ट केल होतं. परंतु घरगुती वापरातील वीज 300 युनिट पर्यंत 30 टक्क्यांनी दर कमी करणार असल्याचे शिवसेनेच्या वचननाम्यात असताना प्रत्यक्षात सदर वचन पूर्ण न झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेत आम आदमी पार्टीने पोलीसांत तक्रार दिली.

निवडणुकीपूर्वी 300 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर 30 टक्क्यांनी कमी करणार असे वचन होते. त्या वचनांवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या 56 उमेदवारांना निवडून दिले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर यांनी राज्यातील जनतेला दिलेली वचन पाळणे त्यांची राजकीय आणि नैतिक जवाबदारी होती. परंतु यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केली आहे.

देशात आणि राज्यात महामारीचे संकट असताना 1 एप्रिल 2020 पासून वीज दरवाढ करून राज्यातील जनतेला फसवले आहे. तसेच 3 रुपये प्रति युनिट प्रमाणे तयार होणारी वीज 15 रुपये प्रमाणे देऊन जनतेची लूट चालू आहे, असं आम आदमी पार्टीने म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

 

मागे

हाथरस अत्याचार : उमा भारती यांचा योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर
हाथरस अत्याचार : उमा भारती यांचा योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर

हाथरस प्रकरणावरून भाजप (BJP) नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य....

अधिक वाचा

पुढे  

हाथरस, बलरामपूरप्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा भाजपला सवाल
हाथरस, बलरामपूरप्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा भाजपला सवाल

“महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्ह....

Read more