By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 12:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नवी दिल्ली - सध्याच्या सरकारी यंत्रणेतील लोकांमध्ये काम करण्याची मानसिकताच नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ते रविवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटले की, मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू इच्छितो. आपल्याकडे पैशांची बिलकूल कमतरता नाही. सरकारी यंत्रणेतील काम न करण्याची मानसिकता, त्यांचा नकारात्मक दृष्टीकोन आणि हिंमतीने एखादा निर्णय घेण्याची क्षमता, या गोष्टी आपल्याकडे नाहीत, अशी खंत गडकरी यांनी बोलून दाखवली.
Union Min Nitin Gadkari: ...Isliye main parso humare ek highest forum mein tha to vo keh rahe the hum yeh shuru karenge, vo shuru karenge, to maine unko kaha aap kyu shuru karenge? Aapki agar shuru karne ki taakat hoti to aap IAS officer ban ke yahan naukri kyun karte? (19.01.20) https://t.co/bXLNBA0QcP
— ANI (@ANI) January 19, 2020
यावेळी गडकरी यांनी एक किस्सा सांगितला. आमच्या नुकत्याच पार पडलेल्या एका उच्चस्तरीय परिषदेत एक अधिकारी आपण हे सुरू करू, ते सुरू करू, असे सांगत होते. त्यावर मी इतकेच म्हटले की, तुम्ही काय सुरु करणार? तुमच्यात काही सुरु करण्याची ताकद असती तर तुम्ही सनदी अधिकारी (IAS) होऊन नोकरी करत बसला नसता. तत्पूर्वी नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने नागपूर शहरातील विविध मैदानांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी छत्रपती नगर येथील मैदानात क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला.
बेळगाव - शिवसेनेचे खासदार संजय राउत यांना बेळगाव विमानतळावर पोहोचत....
अधिक वाचा