By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 05:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असतात मात्र निवडणुका, प्रचार ह्या सगळ्यात खर्च खिशाला परवडणारा नसतो त्यातही उमेदवाराची परिस्थिति बेताची असल्यास अजून त्रासदायक त्यामुळे बर्याच वेळा आर्थिक मदतीसाठी त्या उमेदवाराचे समर्थकच त्याच्या पाठी खंबीरपने उभे राहतात असेच चित्र मनसेचे बेलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गजानन काळे यांच्याबाबत पाहायला मिळाले.
गजानन काळे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मनपा कामगार वर्गात आनंदाचं वातावरण दिसून आलं. मनपाच्या एकूण 1000 कामगारांनी स्वतः पैसे जमा करत गजानन काळे यांची अनामत रक्कम भरली आहे. अश्या प्रकारे अनेक उमेदवाराना निवडणुकी वेळी समर्थकांची साथ मिळालेली आहे. त्यात राजू शेट्टी यांच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी ही अशी परिस्थिति दिसून आली होती.
मनपा कामगारांनी गजानन काळे यांचं भरभरून कौतुकही केलं. कामगारांसाठी लढणारा, आमचे थकीत पगार मिळवून देणारा, आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी एका हाकेवर धावून येणारा, आमच्या सुरक्षेची काळजी घेणारा उमेदवार गजानन काळे आमदार व्हावा अशीही सदिच्छा यावेळी उपस्थित कामगारांनी व्यक्त केली. या कामगारांनी गजानन काळे यांच्या विजयासाठी त्यांना घराघरात घेऊन जाऊ, अशीही भावना व्यक्त केली. नवी मुंबई मनपा कामगारांच्या या प्रतिसादाने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
यावर बोलताना मनसेचे बेलापूर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार गजानन काळे म्हणाले, “कामगारांनी त्यांच्या कष्टाच्या पैशातून विधानसभा निवडणुकीसाठी मला अनामत रक्कम दिली आहे. मनपा कामागारांनी अशा पद्धतीने माझ्यावर विश्वास दाखवल्याने मी गहिवरलो आहे.”
गजानन काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः अमित ठाकरे यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते. काळे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात बेलापूर मतदारसंघात 151 झाडे लावून केली. इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील नवी मुंबई परिसरात झाडे लावत या प्रचारात सहभाग घेतला.
गजानन काळे
गजानन काळे हे विद्यार्थी प्रिय आणि कामगारांसाठी झटणारा माणूस अस्सल्याचे त्याच्या बद्दल आंगीतले जाते. त्यांचं काम पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गजानन काळेंना मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या, महाराष्ट्र सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. याठिकाणी काळे यांनी चांगलं काम केल्यानं गजानन काळेंची मनसेच्या नवी मुंबई शहर अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली. आता त्यांना बेलापूर मतदारसंघातून मनसेने आमदारकीची उमेदवारी दिली
बिग बॉस मराठी 2 सिझनमध्ये गाजलेले अभिजीत बिचुकलेंनी निवडणुकीच्या रिंगणात उ....
अधिक वाचा