ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप, मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप, मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

शहर : मुंबई

मनसेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. त्यामुळे बुलडाणा जिल्हा मनसेला मोठा धक्का बसला आहे.

पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेता पक्षात नवीन आलेल्या लोकांना पदे दिल्याचा आरोप करत बरबडे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने बुलडाणा मनसेमध्ये अस्वस्थता पसरली आहे.नुकतीच बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. या कार्यकारिणीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते आणि जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेता पक्षात नवीन आलेल्या लोकांना पदे दिल्याचा आरोप बरबडे यांनी केला आहे. मनसेच्या प्रभारी जिल्ह्याध्यक्षांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेता पक्षात नव्याने आलेल्या लोकांना पदे दिल्याचा आरोप बरबडे यांनी केला आहे.

बुलडाणा जिल्हा मनसेच्या नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाउपाध्यक्ष गणेश बरबडे यांची भेट घेत आपली नाराजी व्यक्त केली. हेच कारण देत जिल्हा उपाध्यक्ष बरबडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. बरबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मनसेचे राज्य उपाध्यक्ष आनंद एम्बडवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर नेते यांच्याकडे पाठवला आहे. गणेश बरबडे यांच्या आरोपानंतर आणि तडकाफडकी राजीनाम्यानंतर बुलडाणा जिल्हा मनसेला मोठा धक्का बसला आहे.

कोण आहेत गणेश बरबडे?

शिवसेनेतून राज ठाकरे ज्यावेळी बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली तेव्हापासून गणेश बरबडे हे मनसेचे एकनिष्ट म्हणून राहिलेले आहेत. सुरुवातीला त्यांनी चिखली तालुका अध्यक्ष म्हणून काम केलंत्यावेळी प्रथमच त्यांनी चिखली पंचायत समितीमध्ये मनसेचा पंचायत समिती सदस्य निवडून आणला आणि जिल्ह्यात मनसेचे खाते उघडले.गणेश बरबडे यांनी स्वतः नगरपालिका निवडणूक देखील दोन वेळा लढली आहे. मनसेमध्ये एकनिष्ठ असल्याने पक्षाने मागील 5 वर्षापासून त्यांच्यावर जिल्ह्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी सांभाळत असताना जिल्हाभर त्यांनी असंख्य कार्यकर्ते जोडले. विविध आंदोलने तसंच गोरगरिबांची अनेक कामं त्यांनी केली. आपल्या आंदोलनामधून अनेक वंचित घटकांना त्यांनी न्याय मिळवून दिला.

Recommended Articles

मागे

कृषी विधेयकावरून काँग्रेसच्या देशव्यापी पत्रकार परिषदा; पक्षातील मोठ्या नेत्यांचा सहभाग
कृषी विधेयकावरून काँग्रेसच्या देशव्यापी पत्रकार परिषदा; पक्षातील मोठ्या नेत्यांचा सहभाग

कृषी विधेयकावरून काँग्रेस आज देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. आज सर्व राज�....

अधिक वाचा

पुढे  

कृषी विधेयकाविरोधात 'भारत बंद', देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार
कृषी विधेयकाविरोधात 'भारत बंद', देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार

संसदेत नुकतेच पारित करण्यात आलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी संघटनांकड....

Read more