ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कारागृहातून निवडणूक लढवूनही बंडखोर उमेदवार विजयी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 25, 2019 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कारागृहातून निवडणूक लढवूनही  बंडखोर उमेदवार विजयी

शहर : मुंबई

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली तेव्हापासूनच काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले. मराठवाड्यातील विविध मतदार संघांनी साऱ्या महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष वेधून घेतलं होतं. अर्थात त्यामागची कारणंही तशीच होती. सध्याच्या घडीला येथीलच परभणीतील गंगाखेड मतदार संघातून एक धक्कादायक निकाल समोर येत आहे.

शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधींचं बोगस कर्ज घेणाऱ्या 'गंगाखेड शुगर्स'च्या चेअरमनपदी असणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन फेटाळला होता. तरीही, गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या रासपच्या उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी १८ हजारहून अधिक मतांनी या निवडणुकीत यश संपादन केलं आहे. ६१ हजार ८०९ मतं मिळवणाऱ्या महायुतीच्या विशाल कदम यांना गुट्टे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. हा निकाल अधिकच चर्चेचा विषय ठरला कारण, रत्नाकर गुट्टे यांनी थेट कारागृहातून निवडणूक लढवत ते विजयी झाले आहेत.

रासप हा महायुतीचा एक महत्त्वाचा घटक पक्ष असतानाही गंगाखेडची जागा ही शिवसेनेक़डे गेली होती. ज्या तिकीटावर विशाल कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. पुढे महादेव जानकरांनी भाजपवर निशाणा साधला आणि गंगाखेडच्या तिकीटावर रत्नाकर गुट्टे निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. गुट्टे कारागृहात असतानाही त्यांचा दमदार प्रचार करत अखेर त्यांनी गंगाखेडचा मतदारसंघ जिंकला.

मागे

शरद पवारांनी मैदान गाजवलं पण ….
शरद पवारांनी मैदान गाजवलं पण ….

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता होत....

अधिक वाचा

पुढे  

भुजबळांची शिवसेनेला ऑफर, मुख्यमंत्रीपद हवं का उपमुख्यमंत्रीपद?
भुजबळांची शिवसेनेला ऑफर, मुख्यमंत्रीपद हवं का उपमुख्यमंत्रीपद?

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद पाहिजे की मुख्यमंत्रिपद हे त्यांनी ठरवायचं असल....

Read more