ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजप आमदार गोळीबार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2024 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजप आमदार गोळीबार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

शहर : मुंबई

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख शरद गायकवाड याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात महत्वाची घोषणा केली आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार केला. या गोळीबारात शहर प्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन सहा गोळ्या काढण्यात आल्या. त्याविषयावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ले सुरु केले आहेत. आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येईल, असा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला. आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.

गुन्हे शाखा करणार तपास

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. आता एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार आहे. यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने लागलीच तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील तिघं आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांना दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

दोन आरोपी फरार

दरम्यान, आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यात आमदार गणपत गायकवाड आणि हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांचा समावेश आहे. या प्रकरणात आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड इतर दोन फरार आहेत. त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. दुपारी आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलीस किती दिवस कठोडी मागणार? हे पाहावे लागणार आहे.

आमदार गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप

माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी आपण केलेल्या कृत्याचा आपणास पश्चताप नसल्याचे म्हटले आहे.

 

मागे

'थोडा विचार करा',राज ठाकरेंचं मराठा समाजाला जाहीर आवाहन,म्हणाले 'तुम्हाला एका अजेंड्याखाली...'
'थोडा विचार करा',राज ठाकरेंचं मराठा समाजाला जाहीर आवाहन,म्हणाले 'तुम्हाला एका अजेंड्याखाली...'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा बांधव, भगिनींना वस्तुस्थिती तपासा....

अधिक वाचा

पुढे  

 लालकृष्ण अडवाणी भारतरत्न… भाजपला कानपिचक्या; राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
लालकृष्ण अडवाणी भारतरत्न… भाजपला कानपिचक्या; राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प....

Read more