ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढविणार नाहीत.

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 06:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढविणार नाहीत.

शहर : सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल 11 वेळा विजयी झालेले 93 वर्षीय आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ते शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत. सांगोला तालुक्यातील कोळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढविली होती. त्यानंतर 1972 आणि 1995 अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारानी त्यांना प्रचंड मतांनी विजयी केले. विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमिताने सभागृहास सरकारनेही त्यंचा 2012 मध्ये गौरव केला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा 94374 मतांनी पराभव केला होता. 

मागे

राष्ट्रवादीचे मनोहर नाईक ही  शिवसेनेत प्रवेश करणार
राष्ट्रवादीचे मनोहर नाईक ही  शिवसेनेत प्रवेश करणार

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्य....

अधिक वाचा

पुढे  

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

गेले काही दिवस कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश ....

Read more