ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 04:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच

शहर : देश

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्यावर ठाम असून यासंदर्भात अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. काँग्रेस नेत्यांनी त्यांना अध्यक्षपदी राहण्यासाठी तयार केल्याचे वृत्त आले होते. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्र वेगळच आहे. राहुल अजुनही राजीनाम्यावर ठाम आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पाटलय राहुल यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र राहुल यांनी या दोन्ही नेत्यांना भेटण्यास वेळ दिला नाही. दोन्ही नेत्यांना केवळ काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेता आली. यावरून राहुल गांधी राजस्थानच्या काँग्रेस नेत्यांवर नाराज असल्याचे दिसून येते. याआधी राहुल यांनी गहलोत यांना भेटण्यासाठी वेळ दिला होता, परंतु भेट घेतली नव्हती.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आयोजित काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गहलोत, कमलनाथ आणि पी. चिदंबरम यांचे कान टोचले होते. लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांनी कुटुंबातील उमेदवारांना अधिक प्राधान्य दिल्याचे राहुल यांनी म्हटले होते. त्याच बैठकीत राहुल यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता.

 

 

मागे

राज ठाकरे पवारांच्या भेटीला
राज ठाकरे पवारांच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. द....

अधिक वाचा

पुढे  

मोदी सरकारमध्ये सुभाष भामरेंची मंत्रिपदी  वर्णी लागेल की नाही? धुळ्यात शुकशुकाट
मोदी सरकारमध्ये सुभाष भामरेंची मंत्रिपदी वर्णी लागेल की नाही? धुळ्यात शुकशुकाट

आज शपथ घेणाऱ्या मोदी सरकारमध्ये मंत्रिपदी कोणाची वर्णी लागेल? याबाबत किती ....

Read more